Maharashtra Animal Husbandry Program
ahyojana2022@gmail.com कॉल सेंटर संपर्क - 1962 (10AM to 6PM) | टोल फ्री संपर्क - 18002330418 (8AM to 8PM)



तपशील

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

  1. कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
  2. स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
  3. ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.
  4. ज्यांच्याकडे स्वतचे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  5. ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  6. ज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  7. ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
  8. ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्याच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मंढी पालनासाठी पायाभूत सोई - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
  9. ज्यांच्याकडे स्वतः च्या २० मेंढ्या व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अध्था मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत).
  10. ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मॅक्यांच्या एका ठिकाणी राहून स्थापी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
  11. ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
  12. एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता)
  13. भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी पाप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता)
  14. कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघस करण्याकरिता घासड्या बांधण्याचे पंत्र (Mini Sailage Baler cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान वाटप
  15. पशुखाद्या कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदान वाटप
शासन निर्णय पहा (GR) अधिक माहिती पहा..

मेंढ्यासाठी चराई अनुदान:

राज्यातील भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटूंबांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६०००/- असे एकूण रु. २४०००/- चराई अनुदान

मेंढी व शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान:

भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी किंवा ३० वर्षाच्या भाडे करारावर जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदानस्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान :

ग्रामीण परिसरातील कुक्कुट पालनास चालना देणेसाठी भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य

माहिती
Card image cap
Card image cap
Card image cap
Card image cap